रझा : जन्मशताब्दीचा ‘बिंदू’

 सय्यद हैदर रझा अर्थात एस.एच.रझा हे भारतीय चित्रकारीतेच्या अवकाशातील एक अपरिहार्य नाव. आज 22 फेब्रुवारी 2022 रोजी रझा असते तर त्यांनी आपला 100वा वाढदिवस साजरा केला असता. मला ज्या चित्रकारांनी प्रभावित केले त्यात रझा हे एक. रंग, आकार यांच्याकडे पाहण्याची नवी नजर त्यांच्या चित्रांतून मिळते, ‘चित्र’संपल्पनेकडे  पाहण्याची दृष्टी विस्तारते. ‘प्रकृती’चा आत्मा त्यांची चित्रे शोधतात. या शोधातून एक प्रतिप्रकृती ती निर्माण करतात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररचनेद्वारे चित्रांमध्ये एक लय रझा उत्पन्न करतात. पाहणार्‍याला या लयीतील कंपने जाणवत राहतात. यादृष्टीने मला त्यांच्या अनेक चित्रांत सजीवतेचा भास होतो. भारतीय चित्रकारीतेत आपल्या अस्तित्त्वाचे ध्वज फडकवलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपच्या संस्थापक सदस्यांपैकी रझा एक होते. नंतर ते फ्रांसला गेले. तिथेच त्यांची कारकिर्द झाली. पण आपली भारतीय मूळे त्यांनी जपली. अगदी चित्रकारीतेतसुद्धा. निधनाच्या काही वर्षांआधी ते भारतात परतले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मूळ गावी आपली कबर व्हावी अशी त्यांची इच्छा होती. साहित्य व भारतीय तत्त्वज्ञान यांत त्यांना विशेष रूची होती असे मागे कुठेतरी वाचले होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांमधूनही दिसते. 

...तर येथे माझ्या संग्रहातील रझा यांच्या काही चित्रांच्या प्रिंट्स शेअर करीत आहे.



Comments